माय नगर वेब टीम
अहिल्यानगर: सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने समाजातील दुर्बल घटकांसाठी आयोजित करण्यात येणारी विशेष शिबिरे नगर लोकसभा मतदाररसंघातील प्रत्येक तालुक्यात दिव्यांग बांधवांसाठी आयोजित करण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. विरेंद्रकुमार यांच्याकडे निवेदनादवारे केली.
सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने समाजातील दुर्बल घटकांसाठी त्यांची कौशल्ये व क्षमता वाढविण्यासाठी तसेच त्यांना राष्ट्रीय प्रवाहात सामील करण्यासाठी विविध योजना व कार्यक्रम राबविले जातात. या योजना तसेच कार्यक्रम मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात राबविण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन करण्याच्या सुचना सबंधित अधिकाऱ्यांना सुचना देण्याची मागणी खा. लंके यांनी केली.
या मागणीसंदर्भात खा. लंके यांनी मंत्री विरेंद्रकुमार यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. मतदारसंघात आपण गेल्या पाच वर्षात आमदार म्हणून काम करताना दिव्यांग बांधवांसाठी राबविलेल्या विविध योजनांची माहीती मंत्री विरेंद्र कुमार यांना दिली. डॉ. विनयकुमार यांनी खा. लंके यांनी दिव्यांगांसाठी केलेल्या कामाचे कौतुक केले. कोरोना संकटात त्यांनी हजारो रूग्णांना दिलेल्या जीवदानाचीही मंत्री विरेंद्रकुमार यांनी दखल घेत हे काम देशवासीयांच्या कायम स्मरणात राहील अशी टिपन्नीही केली.खा. लंके यांनी केलेल्या मागणीवर कार्यवाही करण्याची ग्वाही मंत्री विरेंद्रकुमार यांनी दिली.