तो अक्षरशः एकटा रडत होता, अनुष्कानं वरुण धवनसोबत शेअर केलेला विराटचा तो प्रसंग

माय नगर वेब टीम
मुंबई: क्रिकेटपटू विराट कोहली सध्या चर्चेत आहे. तो सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. त्याच्यासोबत पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माही आहे. सध्या दोघांच्या आयुष्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. दोघेही लंडनला शिफ्ट होणार असल्याचंही म्हटलं जात आहे. आता अभिनेता वरुण धवननं विराटबद्दलचा एक खास किस्सा शेअर केलाय.

वरुण धवनं यानं एका मुलाखतीत त्याच्या करिअरसोबत इतर काही गोष्टीही शेअर केल्या. गप्पा मारत असताना त्यानं विराटबद्दलचा किस्सा सांगितला. युट्यूबर रणवीर अलहबादियाच्या पॉडकास्टमध्ये बोलत होता. या मुलाखतीत त्यानं अभिनेत्री अनुष्का शर्माचं कौतुक केलं. तसंच विराटला जे यश मिळालंय, त्यात अनुष्काचाही वाटा असल्याचं म्हटलंय.
वरुणनं सांगितला खास किस्सा?
२०१८मध्ये घडलेला हा किस्सा आहे. यावेळी विराट भारतीय संघाचा कर्णधार होता. नॉटिंगहॅम कसोटी सुरू होती. या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा पराभव झाला होता. या पराभवला विराटनं स्वत:ला जबाबदार ठरलं होतं. विराट जेव्हा चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता तेव्हा त्याच्या मानसिक स्थितीबद्दल अनुष्कानं वरुणसोबत काही गोष्टी शेअर केलेल्या.

नॉटिंगहम कसोटी सुरू होती, त्या दिवशी अनुष्कार मैदानात सामना पाहायला गेली नव्हती. सामना संपल्यानंतर विराट नेमका कुठं आहे ते अनुष्काला माहिती नव्हतं. सामना संपल्यावर ती हॉटेलमध्ये विराटला भेटायला गेली होती. विराटच्या खोलीत गेली तेव्हा तिला विराट रडताना दिसला. भारतीय संघाच्या परभावानं तो खूपच खचला होता. संघाच्या अपयशाला तो स्वत:ला दोष देत होता. या कठीण काळात अनुष्कानं त्याला धीर दिला होता, असं वरुणनं सांगितला.

दरम्यान,विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लंडन इथं शिफ्ट होणार असल्याचं म्हटलं जात आहे, पण आता यावर शिक्कामोर्तब झाल्याचं म्हटलं जात आहे. विराट आणि अनुष्का दोघांनाही भारतातलं पापाराझी कल्चर आवडत नाही. मुलांना या सगळ्यापासून लांब ठेवण्यासाठी त्यांनी भारत सोडून लंडनला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय. विराटचे बालपणीचे प्रशिक्षक, राजकुमार शर्मा यांनी यावर भाष्य केलं आहे.