माय नगर वेब टीम
पुणेः Satish Wagh Murder Case : सतीश वाघ यांचे अपहरण करून त्यांची चाकूने भोसकून अत्यंत निर्घूणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणी त्यांच्या पत्नी मोहिनी वाघ हिनेच पती सतीश यांची सुपारी देऊन हत्या घडवून आणली होती. मोहिनी हिला आणि या गुन्ह्यातील इतर आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या प्रकरणात रोज नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा अत्यंत कसून तपास आणि चौकशी केली जात आहे. या प्रकरणात एक नवा ट्वीस्ट समोर आला आहे. मोहिनी वाघ हिने आपले पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान दिली आहे.
गेल्या १० वर्षांपासून सतीश वाघ हे आपल्याला मानसिक आणि शारिरीक त्रास देत होते. तसेच त्यांचे विवाहबाह्य संबंध होते. या कारणावरून अनेकदा मारहाण करण्यात आल्याची माहिती पोलिसांना दिली. घर खर्चासाठी पैसे मागितल्याच्या कारणावरून देखील मारहाण करण्यात आल्याचे मोहिने हिने पोलिसांना सांगितले. यामुळे आता या प्रकरणात रोज नवे ट्वीस्ट आणि धक्कादायक माहिती सतीश वाघ प्रकरणात समोर येत आहे.
आरोपींच्या पोलीस कोठडीत रवानगी
या हायप्रोफाईल मर्डर मिस्ट्रीचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून या प्रकरणी पोलिसांनी पवन श्यामसुंदर शर्मा (वय 30), नवनाथ अर्जुन गुरसाळे (वय ३१, रा. गणेश नगर, डोमखेल रोड, वाघोली, मुळ रा. बीड), विकास ऊर्फ विक्की सीताराम शिंदे (वय 28) आणि अक्षय ऊर्फ सोन्या हरीश जावळकर (वय 29) यांना यापूर्वी अटक केली होती. अतिश जाधवला 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी मोहिनी वाघ आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.