Janhvi Kapoor : जान्हवी कपूरने आंतरराष्ट्रीय फॅशन वीकमध्ये आपल्या डेब्यूने सर्वांचे लक्ष वेधले आहे. बॉलीवूडमध्ये अल्पावधीतच यश संपादन केलेली जान्हवी तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमी चर्चेत असते. तिची हटके आणि दमदार स्टाइल अनेकांच्या पसंतीस उतरली आहे.
आता जान्हवी फॅशनच्या बाबतीत भारताच्या बाहेरही आपली जादू दाखवताना दिसत आहे. तिने नुकतेच पॅरिसमधील एका फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक केला. यानिमित्ताने तिने आंतरराष्ट्रीय रनवेवर पाऊल ठेवले आहे. तिच्या डेब्यू वॉकसाठी तिने राहुल मिश्राने डिझाइन केलेल्या आउटफीटची निवड केली होती. जान्हवीने निळ्या रंगाचा मरमेड स्टाइल स्कर्ट आणि स्ट्रॅपलेस ब्लॅक सिक्विन बस्टिअर टॉप घातला होता. राहुल मिश्राचे ‘ऑरा’ कलेक्शन सादर करण्यासाठी तिने इतर मॉडेल्ससह वॉक केला. तिच्या या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
जान्हवीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने ‘धडक’ चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण केले. नुकताच तिचा ‘मिस्टर एन्ड मिसेस माही’ चित्रपट प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात ती राजकुमार रावसोबत झळकली. आगामी काळात जान्हवी ‘उलझ’ या चित्रपटात झळकणार आहे. तसेच, ‘देवरा पार्ट 1’ चित्रपटातून ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत डेब्यू करणार आहे, ज्याबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत.