भीषण अपघातात चौघे ठार, 10 जण गंभीर जखमी, महाराष्ट्रात कुठे घडली घटना पहा

माय नगर वेब टीम
मुंबई – नगर कल्याण महामार्गावरील गुळंचवाडी परिसरात भीषण अपघात झाला. या अपघातात भरधाव ट्रकने चार जणांना चिरडले तर तब्बल दहा जणांना जखमी केले. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.

सविस्तर असे की सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमार ट्रक नगरहून येत होता. ट्रक वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक अंत्यविधी करुन निघालेल्या माणसांमध्ये भरधाव वेगात शिरला. यात चार जणांचा मृत्यू झाला. दहा ते 15 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना आळेफाटा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. अपघाताची माहिती समजताच आळेफाटा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान अपघातामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महामार्गावर आंदोलन सुरु केले.

महामार्ग गुळंचवाडी गावात्ूान न नेता तो बायपास करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. येथे वारंवार अपघात होत असल्याने आणि आजही भीषण अपघात झाल्याने संतप्त नागरिकांनी आंदोलन करत महामार्ग प्राधीकरणवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. आंदोलनामुळे दोन्ही बाजुने लांब पर्यंत रांगा लागल्या होत्या.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्यासह पोलिस पथक दाखल झाले होते. महामार्गावरील वाहतूक सुरळित करण्यासाठी पोलिसांनी मोठे प्रयत्न केले.