माय नगर वेब टीम
पुणे / मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने राज्यात ठिकठिकाणी धुमाकूळ घातला आहे. त्यातच पुणे आणि मुंबईमध्ये मध्ये काल बुधवारपासून होत असलेल्या पावसामुळे पुणे, मुंबई अक्षरशः तुंबली आहे. रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार होत असलेल्या पावसामुळे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पावसाची अपडेट घेतली जात असून सरकारकडून पावसाच्या पुरात पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारी यंत्रणा सतर्क असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मुळशी धरणातून पाच ते सात हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे. मुंबईतही पावसाने धुमाकूळ घातला आहे. लोकस सेवा विस्कळीत झाली आहे. कामाशिवाय बाहेर पडू नका असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. रायगड, ठाण्यात सतत होत असलेल्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.
हे ब्रीज पाण्याखाली
पुण्यात होत असलेल्या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. बऱ्याच ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे बालेवाडी ब्रीज, मुळा नदी ब्रीज, संगम रोड ब्रीज, होळकर ब्रीज, संगमवाडी ब्रीज, महर्षी शिंदे ब्रीज, हडपसर- मुंढवा रोड ब्रीज, मातंग ब्रीज, येरवडा शांतीनगर येथील ब्रीज, निंबजनगर ब्रीज, मोई, व चिकली रस्त्यावरील इंद्रायणी पुल पावसामुळे पाण्याखाली गेले आहेत.
तीन युवकांचा मृत्यू
पावसामुळे अनेक घरांत पाणी शिरले आहे. नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. अशातच पुलाचीवाडी येथील तीन युवकांना शॉक बसून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याचा अधिक तपास अधिकारी करीत आहेत.
पर्यटनस्थळे 48 तासांसाठी बंद
दोन दिवसांपासून पुण्यात होत असलेल्या पावसामुळे अनेक घरात पाणी शिरले आहे. पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसाबाबत सरकार गंभीर असून क्षणाक्षणाला अपडेट घेत आहेत. पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लष्कराचे जवान व एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली असून सर्व पर्यटनस्थळे 48 तासांसाठी बंद करण्यात आली असल्याची माहिती आहे.