माय नगर वेब टीम
कोपरगाव – शरद पवारांनी विवेक कोल्हे यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बॉडीवर काम करण्याची संधी दिल्याने नुकतीच मंगळवारी व्हीएसआयच्या बैठकीच्या निमित्ताने शरद पवार आणि विवेक कोल्हे यांची भेट झाली. बैठकीनंतर शरद पवार व विवेक कोल्हे यांनी एकाच वाहनातून प्रवास केला.. त्यामुळे कोल्हे पवारांसोबत जाणार या चर्चा सुरु झाल्या. आता मागील काही दिवसांपासून विवेक कोल्हे यांचा राजकीय वनवास सुरु असल्याचे सर्वश्रुत आहे. आता या काळात कोल्हे- पवार एकमेकांना साथ देतील का? अशा चर्चा सुरु झाल्या. पण मित्रांनो तुम्हाला माहित आहे का कोल्हे व पवार यांचे संबंध अगदी तीन पिढ्यांपासून आहेत. विवेक कोल्हे यांचे आजोबा मंजी मंत्री स्व. शंकराव कोल्हे व शरद पवार हे जिवलग सहकारी. आता या जुन्या सहकाऱ्याच्या मदतीची जाण ठेवत त्यांच्या नातवाला शरद पवार आमदार करणार का? शरद पवार याना पहिल्यांदा मुख्यमंत्री करताना स्व. शंकराव कोल्हे यांनी नेमकी कशी साथ दिलीये? काय आहे जुना इतिहास ? कशी असतील आगामी गणिते? हे सविस्तर पाहुयात….
मित्रांनो सर्वात प्रथम आपण शंकराव कोल्हे कोण होते हे पाहूयात ?
मंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते स्व. शंकराव कोल्हे यांचा जन्म कोपरगाव तालुक्यातील, येसगाव या गावी झाला. त्या काळात पुणे विद्यापीठात कृषी विषयात B.Sc केले. युनायटेड स्टेट्स आणि युरोपमध्ये अतिरिक्त प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांना फोर्ड फाऊंडेशन शिष्यवृत्ती देखील मिळाली होती. शंकराव कोल्हे यांनी १९५० मध्ये सरपंच म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि ते राज्यमंत्री पदापर्यंत गेले. १९७२ मध्ये ते महाराष्ट्र विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून आले. राज्यमंत्री म्हणून त्यांनी १९९१ साली महसूल, १९९२ साली परिवहन ही खाती सांभाळली. 2004 ते 2012 पर्यंत त्यांनी श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डीचे उपाध्यक्ष म्हणून काम केले.
आता ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे सम्बन्ध कसे होते ते पाहुयात
ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे घनिष्ठ संबन्ध. पवार यांचे जे जुने सहकारी आहेत त्यापैकी एक म्हणजे शंकराव कोल्हे. काँग्रेसमध्ये असो कि शरद पवार याना मुख्यमंत्री करताना असो कि राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरचा कालावधी असो स्व. शंकराव कोल्हे यांनी शरद पवार यांना मोलाची साथ दिली. शरद पवार यांना पहिल्यांदा मुख्यमंत्री करण्यात माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचा सिंहाचा वाटा होता. शंकराव व बिपीन दादा यांची काही गाजलेली आंदोलने पहिली तर त्यात शरद पवार यांचीच मध्यस्ती फलदायी ठरली होती असं दिसत. म्हणजे पवारांचा शब्द कोल्हेंसाठी महत्वपूर्ण असावा असे दिसते. काळाच्या ओघात अनेक राजकीय व्यक्ती राष्ट्रवादीतून भाजपात आले. त्यात कोल्हे कुटुंबही होत. परंतु असं असलं तरी आजवर कधीही कोल्हे यांनी पवारांवर व पवारांनी कोल्हे यांच्यावर गंभीर प्रकारची टीका केलेली नाही. राजकीय कारकिर्दीच्या सुरवातीपासून ते आतापर्यंत कोल्हे कुटुंबीय हे शरद पवार यांच्या गुडबुक मध्ये राहिले आहे.
आता प्रश्न राहतो तो कोल्हे हे शरद पवार यांच्यासोबत येणार का?
विवेक कोल्हे यांना विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी आता पक्ष निश्चित करणे गरजेचे झालेय. कोल्हे भाजपला रामराम ठोकून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत यावे, अशी काहींची इच्छा आहे. तर कोल्हे परिवार भाजपमध्येच रहावा, अशीही काहींची इच्छा आहे. परंतु काही झाले, हाती तुतारी घ्यायची की मशाल हे ठरवण्याआधी ते शरद पवार व बाळासाहेब थोरात यांच्या सोबत चर्चा करतीलच शिवाय मतदारसंघातील राजकीय समिकरणांचा विचार देखील करतील यात शंका नाही. तसेच शरद पवार यांच्या विषयी असणारी क्रेझ, साथीला असणारे संजीवनी संस्था, कारखाना आदी सहकार, तसेच तीन पिढ्यांपासून कोल्हे कुटुंबीयांनी कोपरगावसाठी केलेला त्याग व विकास यामुळे त्यांचा विजय अगदी सोपा होऊ शकतो अशाही चर्चा आहेत.