Abhishek-aishwarya Bachchan : अभिषेक-ऐश्वर्याच्या वैवाहिक जीवनात मिठाचा खडा!; अभिषेकने पोस्टला लाईक केल्यानंतर नंतर म्हणाला ऑल द बेस्ट….

माय नगर वेब टीम
Abhishek-aishwarya Bachchan News : सध्या सर्वत्र चर्चा आहे ती बॉलिवूडमधील सर्वांत फेमस कपलची. ती म्हणले बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची. यापूर्वीही हि जोडी अनेक कारणांनी चर्चेत आली आहे.

बॉलिवूडमध्ये अभिषक आणि ऐश्वर्या ही जोडी चाहत्यांमध्ये सर्वांधिक लोकप्रिय असून ती परफेक्ट कपलमध्ये गणली जाते. सुरुवातीपासून म्हणजेच अभिषेक-ऐश्वर्या यांच्या लग्नापासून ती जोडी चर्चेत कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये जमत नसल्याचे बोलले जात आहे. तसेच ते त्यांचे वैवाहिक जीवन घटस्फोटाच्या उंबरठ्यावर असल्याचे बोलले जात आहे.

आता नुकतेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या शाही विवाहात अभिषेक ऐश्वर्याने हजेरी लावली. या शाही विवाहात दोघांविषयी अनेक चर्चा झडल्या. परंतू, त्यानंतर अभिनेता अभिषेकने घटस्फोटाच्या एका पोस्टला लाईक केल्याने चाहत्यांना धक्काच बसला आहे. चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. घटस्फोटाची पोस्ट लाईक केल्याची बातमी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. तसेच ती पोस्ट लाईक का केली हे देखील स्पष्ट झाले आहे. परंतू आता अभिषेकने सोशल मीडियावर शेअर केलेल्या नव्या पोस्टमुळे भलतीच चर्चा रंगू लागली आहे.

अभिषेक बच्चन यांनी त्यांच्या इस्टाग्राम स्टोरीवरुन जियोसिनेमाचा आगामी चित्रपट घुडचढीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच संपूर्ण टीमलाही शुभेच्छा दिल्या आहेत.

नुकत्याच झालेल्या उद्योगपती अंबानी कुटुंबातील अनंत आणि राधिका यांचा शाही विवाह 12 जुलै रोजी मोठ्या थाटात पार पडला. या शाही विवाहाला अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यात बच्चन कुटुंबियांनीही हजेरी लावली होती. परंतू, ऐश्वर्या आणि आराध्या या बच्चन कुटुंबासोत येथे पोहोचल्या नव्हत्या. त्यामुळे अभिषेक आणि ऐश्वया विभक्त होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता.

परंतू, शाही विवाहातील दोघांचा एकत्र असलेला एक फोटा व्हायरल झाला होता. त्यामुळे ते विभक्त होणार असल्याच्या फक्त अफवाच होत्या. यास पुष्टी मिळत असून आताही अभिषेकच्या लाईक वरुन सुरु झालेले वादळ पुन्हा एकदा थंड झाले असून विभक्त होण्याच्या केवळ अफवाच असल्याचे आता बोलले जाऊ लागले आहे.