माय नगर वेब टीम
मुंबई : Mumbai Sea Boat Accident : मुंबईच्या समुद्रात प्रवासी बोटीला स्पीड बोटनं दिलेल्या धडकेत आतापर्यंत १३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. अपघात झाल्यानंतर यंत्रणेनं बचावकार्य हाती घेतलं होतं. आतापर्यंत १०१ जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती देण्यात आली. १३ मृतांमध्ये नौदलाच्या तिघांचाही समावेश असल्याची माहिती आहे. मृतांच्या नातेवाइकांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई बोट दुर्घटनेबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. मुंबईच्या गेटवेहून एलिफंटाला जाणाऱ्या प्रवाशांवर काळाने घाला घातला आहे. एलिफंटाला जाणारी नीलकमल बोट स्पीड बोटीच्या धडकेने बुडाली. या बोटमधील १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या बोटमधील १३ जणांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये १० नागरिकांसहित ३ नेव्ही कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या दुर्घटनेत दोघे जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेतील मृतांना ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सांगितली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, ‘पोलिसांपासून कोस्टगार्ड प्रवाशांच्या मदतीला धावले. या बचावकार्यात नौदलाच्या ११ क्राफ्ट आणि ४ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. अद्यापही शोधकार्य सुरु आहे. या घटनेची अंतिम माहिती उद्यापर्यंत देण्यात येईल. सर्व शासनाच्या यंत्रणा घटनेनंतर कामाला लागल्या आहेत. या घटनेतील मृतकांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जाहीर करण्यायत आली आहे. या घटनेची सखोल चौकशी शासनाच्या वतीने केली जाणार आहे’.