माय नगर वेब टीम
सोनाली बेंद्रे बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री. सोनाली नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते आता ही ती एका नव्या कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनयापासून लांब गेलेली सोनाली बेंद्रे आता पुन्हा अभिनयाच्या दुनियेत आली आहे. त्यामुळे तीने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.
90 च्या दशकामध्ये अभिनय क्षेत्रामध्ये सोनाली प्रसिद्ध होती. त्यानंतर ती काळाने अभिनयातून लांब गेली. परंतू, गेल्या दोन वर्षापासून पुन्हा तीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. द ब्रोकन न्यूजमधून पदार्पण केले आहे. दुसऱ्या शोमध्ये ती पत्रकार अमीनाच्या भूमिकेत आहे.
नुकतीचे सोनालीने 90 च्या दशकातील काही गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. ती म्हणते की त्या काळी मलाही खूप हिनवले गेले, तू खूप बारीक असे म्हणत अनेक चित्रपटामध्ये रिजेक्ट केले. चित्रपटाची मार्केटिंग व त्या चित्रपटातील कलाकारांना चर्चेत ठेवण्यासाठी अनेकांच्या लिंकअपच्या अफवा पसरवल्या जायच्या. लिंकअपच्या अफवा पसरवण्याअगोदर त्या संबंधित अभिनेत्रीला विचारलेही जात नसत. अफवांमुळे ती चर्चेत रहायची, पण या गोष्टीत कोणतीही सत्यता नसायची.
लिंकअप च्या गोष्टी मनाला न पटणाऱ्या असल्या तरी त्या काळात पर्याय नव्हता. मला अनेक वेळा निर्मात्यांनी तू खूप बारीक आहेत खात जा असे म्हणून हिरनवले. 90 च्या दशकात स्टार्सच्या मारामाऱ्या आणि लिंकअपच्या बातम्या विकल्या जायच्या. निर्माते अफवा विकायचे. त्याकाळी लिंकअपच्या घटना संबंधितांना विचारल्याही जात नव्हत्या. आज काल तरी विचारले जाते. ती गॉसिप केवळ चित्रपटाच्या प्रमोशनसाठीच होती.