मला मुलगी नाही तर आई आवडते; जान्हवीसोबत काम करण्यास राम गोपाल वर्मांनी दिला नकार

माय नगर वेब टीम
जान्हवीसोबत काम करण्यास राम गोपाल वर्मांनी दिला नकार; म्हणाले “मला श्रीदेवी आवडायची…”
Ram Gopal Varma | सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून श्रीदेवी यांनी इंस्ट्रीत मोठे यश संपादन केले. दाक्षिणात्य चित्रपटांसह बॉलीवूडमध्ये देखील त्यांनी काम केले आहे. त्यापाठोपाठ श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने बॉलीवूडमध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला. अनेकदा जान्हवीची तुलना श्रीदेवी यांच्यासोबत केली जाते. अलीकडेच चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी श्रीदेवी आणि जान्हवीबद्दल भाष्य केले आहे.

राम गोपाल वर्मा यांनी एका मुलाखतीत दिवंगत हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री श्रीदेवी यांच्याबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त केला. त्याचवेळी त्यांना जान्हवी कपूर साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरसोबत ‘देवरा’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाच्या फोटोशूट दरम्यान ज्युनियर एनटीआरने जान्हवी कपूर हुबेहुब तिच्या आईसारखी दिसते, असे वाटल्याचे सांगितले. मात्र आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असलेल्या राम गोपाल वर्मा यांनी ही तुलना नाकारली.

एनटीआरच्या चर्चेवर आपली प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, श्रीदेवी त्याला खूपच आवडत असतील, म्हणूनच तो असं बोलला असेल. ‘पडहारेल्ला वायासू’ असो किंवा ‘वसंत कोकिला’ असे तिने अनेक प्रकारचे परफॉर्मन्स दिले आहेत. मी एक चित्रपट निर्माता आहे, हे विसरून जायचो आणि म्हणून प्रेक्षक तिला आवडीने पाहायचे.

जेव्हा त्यांना विचारण्यात आले की जान्हवी कपूरसोबत काम करणार का? तर ते म्हणाले, ‘मला मुलगी नाही तर आई आवडते’. मात्र, आपण हे कोणत्याही वाईट हेतूने बोलत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले, ‘माझ्या करिअरमध्ये असे अनेक मोठे स्टार्स होते ज्यांच्याशी माझा संबंध नव्हता, त्यामुळे जान्हवी कपूरसोबत चित्रपट करण्याचा माझा कोणताही विचार नाही.’

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, राम गोपाल वर्मा ‘रंगीला’, ‘सत्या’, ‘कंपनी’ आणि ‘भूत’ सारख्या चित्रपटांसाठी ओळखले गेले. आता ते ‘सत्या’ स्टार मनोज बाजपेयीसोबत एका चित्रपटाद्वारे पुनरागमन करणार आहे. तर जान्हवी कपूर ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ आणि ‘परम सुंदरी’ चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.