दिलीप सातपुते यांचा ठाकरे सेनेला पुन्हा जय महाराष्ट्र, म्हणाले कि…

माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : नगर शहरातील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख व माजी नगरसेवक दिलीप सातपुते यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे सेनेत स्वागत केले.

नगर शहरातील राजकारणात सातपुते हे आमदार संग्राम जगताप यांचे विरोधक मानले जातात . यामुळे पक्षाची अडचण नको म्हणुन त्यांनी काही काळ उध्दव ठाकरे यांच्या हस्ते त्यांच्या सेनेत श्रीगोंद्यात प्रवेश केला. आता विधानसभा निवडणूक संपल्याने सातपुते यांची राजकीय अडचण दूर झाली. यामुळे आज सायंकाळी त्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला.

शिंदे यांच्या माध्यमातून केडगाव व नगर शहराच्या विकासासाठी भरीव विकास निधी आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सातपुते यांच्या प्रवेशामुळे केडगावमधील ठाकरे सेनेतील त्यांचे समर्थक व त्यांना माननारे आजी माजी नगरसेवक काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.