माय नगर वेब टीम
मुंबई- संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निकालात महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. निकालातून महाविकास आघाडीमधील मतांच्या फाटाफुटीचा उमेदवार जयंत पाटील यांना फटका बसला असून त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.
विधान परिषदेच्या 11 रिक्त जागांसाठी निवडणूक झाली. 11 जागांसाठी 12 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यात भाजपकडून पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, शिवसेना शिंदे गट कृपाल तूमाने, भावना गवळी. अजित पवार गट (राष्ट्रवादी )
शिवाजीरावर गर्जे, राजेश विटेकर. महाविकास आघाडीचे उमेदवार ःशिवसेना उद्धव ठाकरे गट मिलिंद नार्वेकर, काँग्रेस- प्रज्ञा सातव, राष्ट्रवादी शरद पवार गट समर्थन जयंत पाटील (शेकाप) असे 12 उमेदवार रिंगणात उतरले होते.
या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर की जयंत पाटील विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्यात मिलिंद नार्वेकर यांनी बाजी मारली आहे. तर जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. या झालेल्या निवडणुकीत केाँग्रेसची आठ मते फुटल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीपाठोपाठ झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले होते. या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा वरचष्मा दिसून आला. विधानपरिषदेच्या या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरच सोपविण्यात आली होती. फडणवीसांनी पुन्हा एकदा धक्कादायक निकालाची परंपरा कायम राखली आहे. त्यांनी भाजपाचे चारही उमेदवार पहिल्याच फेरीत निवडून आणले. त्याचबरोबर अजित पवार गट व शिंदे सेनेच्या गटाचाही विजय निश्चित केला.
जयंत पाटील यांच्याकडे 16 मते होती त्यांना सात मतांची आवश्यकता होती. तर ठाकरे गटाचे उमेदवार नार्वेकर यांच्याकडे 15 मते होती त्यांना आठ मतांची गरज होती. ते मिळविण्यात यशस्वी झाले. निकालाअंती जयंत पाटील यांना 12 मते मिळाली. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर कोण्यात पक्षाची मते फुटली याबाबत राज्यात चर्चांना उधाण आले आहे.