माय नगर वेब टीम
Pushpa 2 OTT Release Date : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळाला. चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट यशस्वीपणे चालू आहे. तरीही प्रेक्षक हा चित्रपट कधी आणि कोणत्या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होणार हे वारंवार सोशल मीडियावर विचारत आहेत.
तुम्हाला ‘पुष्पा २’ कुठे पाहता येईल ?
चाहते चित्रपट OTT वर ‘पुष्पा २’ प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत. ‘पुष्पा २’ हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’ या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. एका वृत्तानुसार, नेटफ्लिक्सने या चित्रपटाचे हक्क २७५ कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. OTT वर चित्रपट प्रदर्शित करण्याची मागणी जोरदार आहे. मात्र, यासाठी चाहत्यांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे.
तुम्ही नेटफ्लिक्स वर ‘पुष्पा २’ कधी पाहू शकाल?
चित्रपटाच्या OTT रिलीजबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण तुम्ही ठराविक रिलीज पॅटर्न फॉलो केल्यास, हा चित्रपट थिएटर रिलीज झाल्यानंतर ६ ते ८ आठवड्यांनंतर OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होतो. वृत्तांनुसार, चित्रपट ऑनलाइन पाहण्यासाठी चाहत्यांना फेब्रुवारी २०२५ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
हा चित्रपट OTT वर अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तुम्हाला हा चित्रपट तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेत पाहता येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले असून चित्रपटात अल्लू अर्जुन पुष्पा राजच्या भूमिकेत आहे. तर, रश्मिका मंदान्ना ही श्रीवल्लीच्या भूमिकेत आहे. तसेच, अभिनेता फहाद फासिलने या चित्रपटातील आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधले. ‘पुष्पा २’ च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने १६४ कोटींची ओपनिंग केली होती.तर, या चित्रपटाने १४ दिवसांत ९६२.०४ कोटींचा गल्ला केला आहे. कॅन्सरपासून देखील संरक्षण करते.