प्रेम प्रकरणातून सख्ख्या भावानेच बहिणीची केली हत्या; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

माय नगर वेब टीम
छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरमध्ये 17 वर्षीय मुलीला तिच्याच भावाने 200 फूट उंच डोंगरावरून ढकलून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून सख्ख्या चुलत भावानेच आपल्या बहिणीची हत्या केली.

ऑनर किलिंगच्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. नम्रता गणेश शेरकर ( शहागड, तालुका अंबड) असे मृत मुलीचे नाव आहे. तर ऋषिकेश तानाजी शेरकर असे आरोपी भावाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

काही दिवसांपूर्वी नम्रता घर सोडून निघून गेली होती. आपल्या जीवाला घरच्यांकडून धोका आहे, अशी तक्रारही तिने शहगड पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानंतर घरच्यांनी समजूत काढण्यासाठी मुलीला संभाजीनगरच्या वळदगाव येथे काकाच्या घरी पाठवले.

काकाचा मुलगा ऋषिकेश हा बहीण नम्रता हिला गोड बोलून जवळील खावडा डोंगरावर घेऊन गेला आणि तिथून त्याने तिला खाली ढकलले. यामध्ये मुलीचा मृत्यू झाला. ही अल्पवयीन मुलगी 17 वर्ष 2 महिन्यांची आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.