माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : अहिल्या नगरच्या एमआयडीसीच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी स्व. अशोक सोनवणे यांचा सतत पाठपुरावा असायचा. सरकारच्या माध्यमातून लघु उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते कायम माझ्याकडे प्रश्न मांडायचे. जास्तीत जास्त मदत करण्याचा माझा प्रयत्न असायचा. अहिल्यानगरच्या एमआयडीसीला दिशा देण्याचे काम त्यांनी केले, असे प्रतिपादन राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहेत.
प्रदीर्घ आजाराने सोनवणे यांचे निधन झाले. कुटुंबीयांची भेट घेऊन थोरात यांनी सांत्वन केले. यावेळी त्यांनी सोनवणे यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सुमित सोनवणे, सोनवणे कुटुंबीय, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, लघु उद्योजकांच्या आमी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र खाकाळ, उपाध्यक्ष तथा उद्योजक संजय बंदिष्टी, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आणि चूडीवाला, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, माथाडी कामगार काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे आदींसह उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, त्यांना नगरच्या उद्योजकांच्या प्रश्नांची जाण होती. प्रश्नांचा सखोल अभ्यास त्यांनी केला होता. शहराच्या उद्योग वाढीसाठी त्यांचा कायम आग्रह असायचा. सरकार आणि प्रशासनाची निगडित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांच्या पुढाकारातून अनेक बैठका आम्ही एकत्रित रित्या घेतल्या. त्यातून अनेक प्रश्नही मार्गी लागले. त्यांचा वारसा त्यांची मुलं समर्थपणे पुढे चालवीत आहेत. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अवघड आहे.
किरण काळे म्हणाले, स्व. सोनवणे यांचे उद्योजकांचे प्रश्न सोडविण्या करता आम्हाला कायम मार्गदर्शन असायचे. आव्हानात्मक काळात देखील कायम हसतमुख राहत अत्यंत संयमी स्वभावाने ते परिस्थिती हाताळायचे. आमी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अहिल्यानगरच्या उद्योग जगतासाठी मोठे काम केले. त्यांची उणीव आम्हाला कायम भासत राहील.