धक्कादायक! अहमदनगरमध्ये उड्डाणपुलावरून ट्रक खाली कोसळला, पुढे घडला विचित्र प्रकार…

माय नगर वेब टीम
अहमदनगर – अहमदनगरमध्ये बुधवारी दुपारच्यासुमारास भीषण झाला. या अपघातात उड्डाणपुलावरून भरधाव वेगात चाललेला टेम्पो उड्डाणपुलावरून चांदणी चौक परिसरात खाली कोसळला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.

नगर शहरातील उड्डाणपुलावर बुधवारी (दि.२४) दुपारी भीषण अपघात झाला. उड्डाणपुलावरून भरधाव वेगात जात असलेला आयशर मालट्रक कठडे तोडून खाली कोसळला आहे. मयत व जखमी दोघेही छत्रपती संभाजी नगर येथील आहेत. छत्रपती संभाजीनगरकडून पुण्याच्या दिशेने निघालेल्या या मालट्रक मध्ये (क्र.एमएच २० जीसी ६४५०) पीव्हीसी पाईप व त्याचे साहित्य होते.

उड्डाणपुलावरील वळणावर ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट उड्डाणपुलावरील संरक्षण कठडे तोडत खाली रस्त्यावर पडला.अपघातानंतर जखमीला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातस्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. दरम्यान वारंवार होत असलेल्या अपघातामुळे नगरमधील उड्डाणपुलाच्या प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तर विरोधकांकडून टीकेची झोन्ड उठली आहे.