रेसिडेंन्शिअल मधील २०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
माय नगर वेब टीम
अहमदनगर : विद्यार्थी जीवनात स्पर्धा परिक्षेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या पुढील काळात स्पर्धा परिक्षेशिवाय असे मत संस्थेचे माजी खजीनदार, जेष्ठ विश्वस्त जी.डी. खानदेशे यांनी केले यांनी केले.
इयत्ता ५ एयत्ता ८ मधील शिष्यवृत्ती परिक्षा, एनएमएमएस स्पर्धा परिक्षा, इयत्ता १० वी इयत्ता बारावी बोर्ड परिक्षेतील गुणवंत, निट परिक्षेतील गुणवंतांसह सीए परिक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे जिल्हा मराठा संस्थेतर्फे स्मृतीचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपिठावावर संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, खजीनदार ॲड. दिपलक्ष्मी म्हसे, विश्वस्त मुकेश मुळे, अरुणा काळे, प्राचार्य विजयकुमार पोकळे, उपप्राचार्य दादासाहेब वांढेकर, उपमुख्याध्यापक धनंजय म्हस्के यांच्यासह शिक्षक प्राध्यापक उपस्थित होते.
संस्थेचे माजी खजीनदार, जेष्ठ विश्वस्त जी.डी. खानदेशे म्हणाले, विद्यार्थी जीवनात स्पर्धा परिक्षेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या पुढील काळात तुम्ही स्पर्धा परिक्षेत टिकलात तरच जीवन सुखकर होणार आहे. संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयातून शिकून बाहेर पडलेले विद्यार्थी आज आयएस, आयपीएस सारख्या परिक्षेत उज्वल यश मिळवून देशसेवा करत आहेत, त्यांच्या अभिमान रेसिडेंन्शिअल विद्यालय व जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाला असल्याचे त्यांनी सांगितले.
रेसिडेंन्शिअल विद्यालयातून सन २३-२४ या शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धा परिक्षेतून यश मिळवलेल्या २०० विद्यार्थ्यांच्या त्यांच्या पालकांसह गौरव आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष दरे म्हणाले विद्यार्थ्यांच्या यशामागे शाळा महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थ्यांचे पालक, व विद्यार्थ्यांनी घेतलेली प्रामाणिक मेहनत असल्याने आपली संस्था जिल्हाभरात कायम वरच्या क्रमांकावर राहीली आहे.
मुकेश मुळे म्हणाले शिष्यवृत्ती परिक्षेतील ७८ गुणवंत, दहावी परिक्षेतील ७० गुणवंत आहेत. अगामी काळात या गुणवंताचा अकडा शतकापार जाण्यासाठी शिक्षकांनी अजून प्रयत्न करावेत. या वेळी काही गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
संस्था हे आमचे दुसरे कुटूंब
आमच्या कुटूंबात पालक आम्हाला जन्म देऊन सुसंस्कारीक करण्यासाठी शाळेत पाठवतात. या शाळेत सर्व शिक्षक आम्हचे दर्जेदार व्यक्तिमत्व घडवण्यासाठी पालकांपेक्षा जास्त प्रयत्न करत असल्याने ही संस्था म्हणजे आमचे दुसरे कुटूंबच आहे, असे मत विद्यार्थ्यंनी सत्काराप्रसंगी व्यक्त केले. प्रारंभी प्राचार्य पोकळे यांनी प्रास्ताविक केले, कार्यक्रमाचे सूत्रसांचालन धनंजय म्हस्के, प्रशांत ढगे, रवींद्र देव्हढे यांनी तर आभार दादासाहेब वांढेकर यांनी मानले.