माय नगर वेब टीम
Rashmika mandanna and Aijay devarakonda | अभिनेत्री रश्मिका मंदान्ना अनेकदा अभिनेता विजय देवरकोंडासोबतच्या नात्यामुळे चर्चेत आली आहे. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे म्हंटले जाते. यातच आता न्यू ईअरचे सेलिब्रेशन करण्यासाठी हे दोघे एकत्र परदेशात जात असल्याचे म्हंटले जात आहे. कारण दोघेही विमानतळावर स्पॉट झाले आहे.
रश्मिका मंदाना विमातनाळावर दिसल्यानंतर याच विमानतळावर विजय देवरकोंडा देखील दिसला. ते दोघेही वेगवेगळ्या वेळेला विमानतळावर पोहोचले. हे दोन्ही सेलिब्रिटी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी एकत्र आले असून ते एकत्रच न्यू इअरचे सेलिब्रेशन करणार असल्याचा दावा केला जात आहे. विजय देवराकोंडा विमानतळावर मास्क घातलेला दिसला, पण पापाराझींसमोर येताच त्याने चेहऱ्यावरून मास्क काढून टाकला.
याआधी दोन वर्षांपूर्वी रश्मिका आणि विजय देवरकोंडा विमानतळावर अशाच प्रकारे एकत्र दिले होते. त्यानंतर या दोघांचीही मालदीवमध्ये सुट्ट्या घालवत असल्याचे काही फोटो समोर आले. यावेळी देखील हे दोघे एकत्र फिरायला जात असल्याचा दावा केला जात आहे.
काही दिवसांपासून विजय आणि रश्मिका डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत. विजय देवरकोंडाने तो रिलेशनशीपमध्ये असल्याचं मान्य केलं आहे. मात्र त्याने रश्मिकां मंदान्नाचे नाव घेतलेले नाही. मात्र हे दोघेही अनेकवेळा एकत्र दिसले आहेत.
दरम्यान, रश्मिकाचा ‘पुष्पा २ : द रूल’ सिनेमानं ९०० कोटींच्या वर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. या चित्रपटानंतर ती लवकरच अभिनेता विकी कौशलच्या आगामी ‘छावा’ या चित्रपटात दिसणार आहे.